वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहनजी दिपके .
वाशिम – शहरातील विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेनेतर्फे १८ सप्टेंबर रोजी जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास युवक प्रदेशाध्यक्ष तथा सरपंच किरणभाऊ घोंगडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना घोंगडे म्हणाले, "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रखरपणे चालणारी रिपब्लिकन सेना ही खरी आंबेडकरी चळवळ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आंबेडकरी चळवळीतील हताश झालेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेसोबत युती करून समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम रिपब्लिकन सेनने केले आहे. आता कार्यकर्त्यांना सत्तेची चव चाखायला मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद निर्माण करून माननीय आंनदराज आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संधीचे सोने करावे," असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्याला विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रफुल्लभाई शेंडे, महाराष्ट्र नेते श्रीपती ढोले सर, लिगल सेलचे नेते अॅड. रावणजी धाबे, ज्येष्ठ नेते डॉ. चेतन इंगळे, जिल्हाध्यक्ष अॅड. समाधान साळवे, युवा जिल्हाध्यक्ष भुषण मोरे, युवती जिल्हाध्यक्ष आरतीताई ठोके, शहराध्यक्ष रवीनाताई जाधव, अकोला जिल्हाध्यक्ष जयकुमार चौरपगार, यश कंकाळ, खडसे साहेब, लखन सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मणिष गायकवाड यांनी शेकडो समर्थकांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महासचिव सिद्धार्थ राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक जिल्हाध्यक्ष भुषण मोरे यांनी मानले.


Post a Comment
0 Comments