वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
पुणे – शहरातील टोळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडात मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाली आंदेकर यांच्यावर या प्रकरणातील कटकारस्थान रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणाने पुण्यात मोठी खळबळ उडवली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. शहरातील वाढत्या टोळी युद्धाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीवर कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments