वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहन दिपके
डोंबिवली – बहुजन समाजात आत्मसन्मान, शिक्षणाचे महत्त्व, समता व न्याय यांची विचारधारा रुजवणारे द्रविड नायक पेरियार यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी इंदिरा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सायंकाळी ८ वाजता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. योगेश गायकवाड (अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) युवक आघाडी, कल्याण-डोंबिवली जिल्हा) तसेच मा. संदीप गजघाट (आंबेडकरवादी जनहित संघटना) उपस्थित होते.
या वेळी पक्षाच्या वतीने पेरियार यांचा पुतळा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत बसवावा अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन दीपक भालेराव (महासचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) युवक आघाडी, कल्याण-डोंबिवली जिल्हा) यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार सुमित कनकुटे (अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) डोंबिवली युवक आघाडी शहर कमिटी) यांनी मानले.
या प्रसंगी अमित गायकवाड (कार्याध्यक्ष), अन्वर भाई शेख, जितेंद्र वाघमारे, नेमीचंद वाघमारे, प्रकाश गायकवाड, अर्जुन केदार, प्रदीप तायडे, सुमित जाधव, राज तायडे, सुरेश नेरकर, अजय सकपाल, पत्रकार रोहित मस्के तसेच इतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments