वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
(ता. बाळापूर, जि. अकोला)
*प्रतिनिधी : सुजाता हिवराळे*
दि. ०१ सप्टेंबर २०२५
हाता येथे मागील तीन महिन्यांपासून वर्षावासाचे आयोजन करण्यात आले असून, या वर्षावासामध्ये बुद्ध आणि धम्मग्रंथांचे पठण सुरू आहे. या पठणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या २० वर्षांचा तरुण विपुल बाळू पाचपोर स्वतः पुढाकार घेऊन ग्रंथपठण करीत आहे. या कार्यात प्रियदर्शिता महिला संघ त्याला सक्रिय सहकार्य करत आहे.
समाजामध्ये आजच्या पिढीतील अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात असताना, विपुलने दाखवलेला मार्ग नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. जर समाजातील इतर तरुणांनीही त्याचे संस्कार व गुण आत्मसात केले, तर आपल्या समाजामध्ये अंधकार न राहता ज्ञान आणि जागृतीचा प्रकाश पसरू शकतो.
या मुलाच्या प्रयत्नामुळे समाजातील तरुणांना दिशा मिळेलच, पण व्यसनाधीनतेपासून दूर राहून धर्म, शिक्षण व संस्कार याकडे वळण्याची संधी देखील उपलब्ध होईल. या ग्रंथपठणाचे दर्शन घेतलेले अनेक जण म्हणतात की – “या ग्रंथपठणाच्या माध्यमातून व्यसनाधीन तरुण नक्कीच काहीतरी शिकतील व योग्य मार्गावर येतील.”
👉 विशेष म्हणजे, विपुल बाळू पाचपोरसारखे तरुण जर समाजासाठी कार्यरत झाले, तर पुढील पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि समाजामध्ये परिवर्तनाची नवी पहाट उगवेल.


Post a Comment
0 Comments