वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
जालना (प्रतिनिधी) : मे २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन सर्व भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील तलाव ओसंडून वाहत आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मका तसेच फळबागांची पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत.
गल्हाटी नदीच्या काठावर असलेल्या पिठोरी सिरसगाव (ता. अंबड) या गावात पाणी शिरल्याने घरगुती व शेतीसह मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदीच्या पाण्यामुळे गोळेगाव (ता. परतुर) हे गाव वारंवार पाण्याच्या वेढ्यात अडकते. त्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट कर्जमाफी करावी व २०२४ च्या अतिवृष्टीत मंठा तालुक्यात बाधित झालेल्या २६ गावांना नुकसानभरपाईचे अनुदान वाटप करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनातील इतर मागण्या पुढीलप्रमाणे :
गोळेगाव (ता. परतुर) गावाचे धरणग्रस्तांच्या धर्तीवर पुनर्वसन करावे.
मौजे पिठोरी सिरसगाव (ता. अंबड) गावाचे तातडीने पुनर्वसन करावे.
मौजे बोडखा बु. (ता. घनसावंगी) येथून सागर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे तसेच बोडखा बु. ते खालापुरीकडे जाणाऱ्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे.
हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष मा. दिपक भाऊ डोके, जिल्हा कार्याध्यक्ष मा. परमेश्वर खरात, ज्येष्ठ नेते मा. चोखाजी नाना सौंदर्य, ओबीसी नेते मा. रामप्रसाद थोरात, जिल्हा उपाध्यक्ष मा. गोवर्धन जाधव, मंठा तालुका अध्यक्ष मा. सुभाष जाधव, घनसावंगी तालुका अध्यक्ष मा. समाधान तोडके, अंबड तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे, घनसावंगी तालुका महासचिव मा. बाबासाहेब गालफाडे, दिलीप मगर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.



Post a Comment
0 Comments