वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
प्रतिनिधी:- अनंता भोईर
शहापूर, ७ सप्टेंबर २०२५:
समर्पण बहुद्देशीय सामाजिक संस्था, शहापूर यांच्या वतीने मागील वर्षांप्रमाणे यंदाही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहाने पार पडला. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावीमध्ये ८३.७०% गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या *पायल रवींद्र कशिवले* हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्पण संस्थेचे अध्यक्ष मा. कुमार उखाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. बी.के. जोधव साहेब, कार्यालयीन अधीक्षक, परिवहन विभाग, ठाणे (सेवानिवृत्त), मा. संतोष सावळे, अध्यक्ष, कोकण विभाग कारस्टाईल कर्मचारी कल्याण महासंघ आणि मा. कांतीलाल भडंगे, सरचिटणीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. कांतीलाल भडंगे यांनी केले. तसेच उपाध्यक्ष रामदास भोईर, कार्याध्यक्ष अॅड. शेखर रघुले, खजिनदार रवींद्र गायकवाड, सहसचिव नंदू शेलार, आणि संचालक अनंता सोनावणे, राहुल साळवे, भरत धनगाव, बाळाराम बाठिवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान केला गेला.
संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वी पार पडल्याचे सांगितले गेले.



Post a Comment
0 Comments