वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहन दिपके
अहमदनगर (अहिल्यानगर) :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनीलजी साळवे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) या संघटनेच्या वतीने करण्यात आली.
राज्य महासचिव ऍड. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड व कर्जत तालुक्याचे प्रांताधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी तपासातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
एन.डी.एम.जे.ने खालील मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या :
फरार आरोपींना पकडण्यासाठी सर्व बाजूंनी पथके रवाना करावीत.
फरार आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करावी.
साळवे कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.
आरोपींवर "मोका" कायद्यांतर्गत कारवाई करावी.
सर्व परिस्थितीजन्य पुरावे तात्काळ नोंदवावेत.
खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.
खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून तात्काळ निकाल लावावा.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे.
दोन महिन्यांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (पुणे) व राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग (मुंबई) यांनी घटनास्थळी भेट द्यावी.
या सर्व मागण्यांवर गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.
या चर्चेदरम्यान एड. दत्ता चव्हाण, अनिरुद्ध गायकवाड तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी देखील सुनील साळवे यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांना सांत्वन केले. तसेच, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक पोलिस प्रशासनाला दिले.
एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्य सचिव वैभव तानाजीराव गीते यांनी स्पष्ट केले की, “साळवे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहू आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत सहकार्य करू.”
✍️ वैभव तानाजीराव गीते
राज्य सचिव, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
📞 8484849480


Post a Comment
0 Comments