वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मॅनेजमेंट हेड गौतम घायवट सर
कल्याण – २० सप्टेंबर २०२५
कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) तर्फे आयोजित जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत साई इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे.
त्वायकांडो स्पर्धेत इयत्ता10 वीची कु. भव्य भोईर आणि 9 वीचा कु. उज्वल पांडे यांनी सुवर्णपदक पटकावत शाळेची शान वाढवली. केडीएमसीच्या पावसाळी क्रीडा स्पर्धेला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ झाला असून कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ, त्वायकांडो, कराटे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
साई इंग्लिश स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी आणि विद्यालयाच्या आधारस्तंभ सौ. मैथिली मूर्ती यांनी केले.
या यशात मुख्याध्यापक श्री. राठोड एम.जे., उपमुख्याध्यापक श्री. गौतम घायवट, वरिष्ठ शिक्षिका सौ. कविता बडगूजर, क्रीडा शिक्षक श्री. पाटील एस.आर. आणि श्री. उदय जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क : 9076239181



Post a Comment
0 Comments