Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वेरूळ एटीएम फोडकांड उघडकीस – १६ लाखांची रोकड लंपास करणारी टोळी जेरबंद!


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :

वेरूळ येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनवर धाड टाकून तब्बल १६ लाख ७७ हजार १०० रुपयांची रोकड लंपास करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ही धडक कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहनं, मोबाईल, एटीएम फोडणीचं साहित्य तसेच एअर गनसह एकूण ₹१२ लाख ७० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


 *गुन्ह्याची पार्श्वभूमी* 

 *११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२.१० ते पहाटे ३.२५ वाजेदरम्यान वेरूळ येथील कैलास हॉटेलसमोर असलेल्या SBI एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी रोकड लंपास केली होती.* या प्रकरणी SBI एटीएम रिजनल मॅनेजर विकास निकाळजे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. *त्यानुसार कलम 305, 331(4), 3(5) भा.न्या. संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.* 


 *टोळी पोलिसांच्या सापळ्यात* गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी विशेष सूचना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले.

तांत्रिक तपासात आरोपींनी क्रिम रंगाचा अशोक लेलंड मिनी टेम्पो वापरल्याचे निष्पन्न झाले. ही गाडी सिडको पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेल्याचेही स्पष्ट झाले. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सतबिरसिंग कलानी व त्याच्या साथीदारांवर लक्ष केंद्रित केले.


२२ सप्टेंबर रोजी पडेगाव येथील आझादनगर भागात सापळा रचून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले.



 *पकडलेले आरोपी* 


1️⃣ दयासिंग गुलजारसिंग टाक (४५), जालना

2️⃣ जीवन विजय वाघ (२८), पडेगाव, संभाजीनगर

3️⃣ सतबिरसिंग हरबनसिंग कलानी (२१), उस्मानपुरा, संभाजीनगर

4️⃣ युवराज उर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे (४४), बनेवाडी, संभाजीनगर


 *कबुलीजबाब व जप्ती* 


कडक चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, १० सप्टेंबरच्या रात्री त्यांनी मिनी टेम्पो चोरून वेरूळ येथे एटीएम मशीन उचलले व आझादनगरमधील बांधकाम सुरू असलेल्या घरात नेऊन कटर मशिन व विद्युत प्रवाहाने एटीएम फोडून रोकड वाटून घेतली.


 *पंचासमक्ष आरोपींच्या ताब्यातून जप्त :* 

💰 रोकड – ₹४,१४,९००

🚗 मारुती स्विफ्ट VDI कार (MH 02 DJ 1864)

🏍️ होंडा शाइन मोटारसायकल (नवीन, विना नंबर)

📱 तब्बल १०७ मोबाईल फोन

🔧 ड्रिल मशिन, इलेक्ट्रिक कटर, हातोडा, टॉर्च, लोखंडी कात्री, नायलॉन दोरी, धारदार चाकू

🔫 एअर गन (धाक दाखवण्यासाठी वापरलेली)


एकूण जप्तीची किंमत : ₹१२,७०,५४०

 *पोलिसांची कामगिरी* 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत पो.नि. विजयसिंह राजपूत, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि महेश घुगे, तसेच श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, कासीम शेख, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबिरसिंग बहुरे, आनंद घाटेश्वर, शिवाजी मगर, योगेश तरमाळे, जीवन घोलप आदींचा मोलाचा सहभाग होता.

 *LCB च्या या धाडसी* कारवाईमुळे जिल्ह्यातील एटीएम चोरी प्रकरणातील सर्वात मोठा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना हादरा दिला आहे.



Post a Comment

0 Comments