वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
वासिंद (ता. शहापूर) — ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळ व वासिंद शाखेच्या वतीने सेवानिवृत्त कामगारांचा भव्य जाहिर मेळावा सरस्वती विद्यालय, वासिंद येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे 150 ते 200 सेवानिवृत्त रेल्वे कामगारांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
मेळाव्याची सुरुवात काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. प्रारंभी काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांनी सेवानिवृत्त कामगारांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.
त्यानंतर काॅ. रसीक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय) यांनी आगामी आठवे वेतन आयोग (8th Pay Commission) लागू व्हावे यासाठी सर्व कामगारांनी एकजूट होऊन सरकारविरोधात लढा देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले.
मेळाव्यात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, सीआर/केआर) यांचा मुंबई मंडळ व वासिंद शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थित कामगारांना आश्वासन दिले की, “आप हमारे साथ रहो, आपके सुख और दुःख में हम आपके साथ हैं.”
यावेळी त्यांनी समाजसेवेचा आदर्श ठेवत सरस्वती विद्यालय, वासिंद यांना ₹1 लाखाची देणगी जाहीर केली. या देणगीबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांचे आभार मानले.
मेळाव्यास काॅ. रसीक मलबारी, काॅ. जे. एन. पाटील, काॅ. अरुण मनोरे, काॅ. नारायण सोनावने, काॅ. वसंत कासार, काॅ. आनंदा भालेराव, काॅ. आर. पी. सिंह, काॅ. प्रकाश सोनोने, काॅ. प्रकाश आर. कांबळे, काॅ. प्रल्हाद खंदारे, काॅ. दिलीप वेंखडे, काॅ. दिलीप शिंदे, काॅ. आनंदा समुद्रे, काॅ. गुलाब शिंदे, काॅ. आशोक सोनावने, काॅ. राजु जगताप, काॅ. आनंद जाधव, काॅ. अहमद खान, काॅ. नंदु बोंडवे, काॅ. अनंत लगड आणि सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्याच्या शेवटी वासिंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी उपस्थित सेवानिवृत्त कामगारांना सायबर फसवणुकीबाबत जागरूकता दिली. “फसवणूक झाल्यास त्वरित 112 वर कॉल करा,” असे आवाहन त्यांनी केले.
मेळावा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि उर्जस्वल वातावरणात पार पडला.
मेळाव्याच्या शेवटी घोषणा देण्यात आल्या —
“काॅ. वेणु पी. नायर जी को लाल सलाम!
एन.आर.एम.यू. जिंदाबाद!
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद!
लाल बावटा करे पुकार, दुनियाके मजदूर एक हो!”





Post a Comment
0 Comments