Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

श्री. बंडू पोटफोडे यांचे दुःखद निधन — महापुराच्या नुकसानीने हतबल होऊन आत्महत्या

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे .

गेवराई (प्रतिनिधी) — गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन शनीचे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. बंडू दगडुजी पोटफोडे (वय 38) यांनी महापुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे हतबल होऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.


सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये आलेल्या गोदावरी नदीच्या महापुरामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच श्री. पोटफोडे यांच्या कष्टाने कसलेल्या शेतीवरही पाण्याचे प्रचंड संकट आले. पिके पूर्णपणे वाहून गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यातच मुलांच्या शिक्षणाची फी, घरखर्च, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि येणारी दिवाळी या सर्व कारणांमुळे मानसिक ताण वाढला होता. या तणावातून बाहेर पडता न आल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.


घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.


श्री. बंडू पोटफोडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन बहिणी, लहान भाऊ, भाऊजाई आणि त्यांची दोन मुले असा मोठा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.


गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करून पोटफोडे कुटुंबाला दिलासा द्यावा, तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments