वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर तालुका (प्रतिनिधी) : शंकरजी गायकवाड
यावर्षी अनावश्यक जास्त पावसामुळे भात कापणीत उशीर झाला होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसामध्ये सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली आहे. टाकी, पठार, फणसवाडी, करपटवाडी, गांगणवाडी, झापवाडी, बिलकडी, सावरोली, खरपत, करांगण अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले धान्य कापणे सुरू केले आहे.
सध्या काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे चिखलातून कापलेले भात बाहेर काढणे शेतकऱ्यांसाठी मोठा आव्हान ठरत आहे. यावर्षी अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, बाकी राहिलेल्या धान्याच्या सुरक्षिततेबाबत शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसामुळे भाताची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम झाला असून, यंदा धान्य वेळेत कापले नाही तर पुढील कालावधीत शेतीस मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक शेतकरी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि भात लवकर कापण्यासाठी रात्रीसुद्धा काम करत आहेत.


Post a Comment
0 Comments