Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

झापवाडी ते टाकी पठार रस्त्यावरील नवीन पूल उध्वस्त स्थितीत; नागरिकांना मोठा त्रास

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड .

झापवाडी – झापवाडी ते कानडी आणि झापवाडी ते टाकी पठार या मुख्य रस्त्यांवरील नुकताच बांधलेला छोटा पूल सध्या खड्ड्यांनी भरून उध्वस्त अवस्थेत असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वडाचीवाडी, गांगणवाडी, झापवाडी आणि टाकी पठार या अनेक वाड्यांचा संपर्क या पुलावरून होत असल्याने, पुलाची दयनीय अवस्था नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखी ठरत आहे.


हा पूल काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र पावसाळा संपल्यानंतरही पुलाचे काम अपूर्णच आहे. सिमेंट आणि डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “शासनाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही प्राथमिक व मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः स्थानिक शाळांमधील लहान मुलांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


नागरिकांच्या प्रमुख मागण्या :


पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.


खड्डे बुजवून सुरळीत वाहतूक सुरू ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.


संबंधित ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.


भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी जबाबदार यंत्रणेकडून काटेकोर देखरेख ठेवण्यात यावी.


स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन त्वरीत कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.




Post a Comment

0 Comments