Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सावत्र आईचा अमानुष प्रकार! १३ वर्षांच्या मुलासोबत घृणास्पद कृत्य — नाशिकमध्ये संतापाची लाट

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

ठाणे जिल्हाप्रमुख : मनोहरजी गायकवाड

नाशिक : नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३४ वर्षीय सावत्र आईने आपल्या १३ वर्षांच्या सावत्र मुलासोबत अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.


गायकवाड मळा परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा १३ वर्षीय मुलगा आणि ८ वर्षीय मुलगी पतीकडे राहत होते. पतीसोबत राहणारी सावत्र आई दोघांनाही वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती. मुलांना जेवण न देणे, उन्हात उभे करणे असे अमानुष प्रकार ती करत होती.


दरम्यान, या सावत्र आईने मोठ्या मुलासोबत अश्लील बोलणे, त्याचे नकळत व्हिडिओ चित्रीकरण करणे आणि घरात एकटा असताना त्याच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप मुलाच्या सख्ख्या आईने तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर मुलगा अत्यंत घाबरला होता. त्याने घडलेला प्रकार आपल्या सख्ख्या आईला सांगितला.


त्यानंतर आईने तातडीने ‘चाइल्ड हेल्पलाइन’वर संपर्क साधून ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपनगर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध ‘POCSO’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून परिसरात या अमानुष घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.




Post a Comment

0 Comments