वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका (प्रतिनिधी) :शंकरजी गायकवाड .
गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषदेच्या अस्नोली शाळेत दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा सांगता सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सांगता समारंभास महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या ‘हेडाम’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मा. श्री नागू वीरकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कठीण परिस्थितीवर मात करत पुढे जाण्याचे महत्त्व, मातृभाषा ‘अभिजात मराठी’ची जोपासना आणि साहित्यासोबत राहून पुस्तकांशी मैत्री करण्याची गरज यावर त्यांनी सखोल भाष्य केले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या प्रसंगी गावचे सरपंच मा. विष्णू देसले, ग्रामस्थ मा. श्री रघुनाथ दिनकर, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा स्नेहाताई दिनकर, मनस्वीताई दिनकर, मुख्याध्यापक श्री. विजय पाटील, श्री. राजेंद्र सापळे, आदर्श शिक्षक श्री. नवनीत फर्डे तसेच शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments