वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक:- रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : दिः 02-10-25 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेने परिसर शोकाकुल झाला आहे. ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्याच्या खोल भागात बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना टेंभापुरी धरणाजवळील तलावात घडली. दसरा साजरा झाल्यानंतर काही मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी धरण परिसरात गेली होती. पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात अडकली आणि काही क्षणांतच दुर्घटनेत ओढली गेली.
या घटनेत बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे अशी आहेत :
इरफान इसाक शेख (१७ वर्षे)
इम्रान इसाक शेख (१० वर्षे)
जैनखान हयात खान पठाण (९ वर्षे)
व्यंकटेश (गौरव) दत्तू तारक (११ वर्षे)
घटनास्थळावर पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन शोधकार्य हाती घेतले. मात्र तोपर्यंत या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दसऱ्यासारख्या मंगलमय दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पाण्याजवळ जाण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.


Post a Comment
0 Comments