वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : शहरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी, नवविवाहित महिला, हिने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला अलीकडेच विवाहबद्ध झाली होती. पती पोलीस खात्यात कार्यरत असून सासरी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही घटना घडल्यानंतर लगेचच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला. सध्या या प्रकरणी पती व सासरच्या मंडळींवर अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात असून तपास सुरू आहे.
या घटनेने पोलिस दलासह स्थानिक नागरिकांमध्येही संताप व दुःखाची भावना व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments