Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संत गजानन महाराज मंदिरात पाशांकुशा एकादशीनिमित्त महाप्रसादाचा भक्तिमय सोहळा


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

जनुना (ता. खामगाव) : आज दिनांक ३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार रोजी जनुना गावातील संत गजानन महाराज मंदिर येथे पाशांकुशा एकादशीनिमित्त महाप्रसादाचा भक्तिमय सोहळा मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने पार पडला. सकाळपासूनच मंदिर परिसर भक्तांच्या ओढ्याने व गजराने गजबजून गेला होता.


या महाप्रसादाचा लाभ गावातील तसेच परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला. महाप्रसादात खास करून साबुदाणा खिचडी व केळीचा समावेश होता. स्वादिष्ट प्रसादाचा आस्वाद घेत भक्तांनी समाधान व्यक्त केले.




मंदिर विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व गावातील युवकांनी आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला. मंदिर परिसराची स्वच्छता, आकर्षक फुलांची सजावट व शिस्तबद्ध पद्धतीने केलेले प्रसाद वितरण यामुळे कार्यक्रम अधिक भावपूर्ण झाला.


गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व भाविकांनी अशा धार्मिक सोहळ्यांमुळे गावात एकोपा, श्रद्धा व भक्तीभाव वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केल्याबद्दल संत गजानन महाराज मंदिर व्यवस्थापन समितीचे विशेष आभार मानण्यात आले.




Post a Comment

0 Comments