वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
इगतपुरी (प्रतिनिधी) —मिलिंदराज पंडित .
आज रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरली (ता. इगतपुरी) येथे फॅन्टी फाऊंडेशनच्या वतीने ‘एक करंजी मोलाची’ या उपक्रमांतर्गत गोड दिवाळी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आदिवासी पोशाखात स्वागत गीत सादर करून आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. विशेष म्हणजे जांबवाडी आणि बोरली येथील पुरुषवर्गाने पारंपरिक ‘कामडी नाच’ हे आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आदिवासी बांधवांना भांडी आणि दिवाळी फराळ वाटण्यात आला. फाऊंडेशनच्या सदस्यांचे गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली ठाकरे मॅडम, शिक्षक दिपक भदाणे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भले, गावाचे पोलिस पाटील रविंद्र पंडित, नव महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे पत्रकार, कवी परिवर्तन गाव विकास समितीचे अध्यक्ष मिलिंदराज पंडित, माजी ग्राम सदस्य प्रकाश पंडित, वाघू पंडित, देविचंद पंडित, मच्छिंद्र भले (माजी सरपंच), गंगाराम आगविले, बाळू सावंत, श्रावण वीर, बाळू भले, गुलाब आगविले, भीमा भले, कृष्णा भालेराव, युवराज पंडित, सुनील पंडित तसेच समितीच्या सचिव अनिता ताई भले, चंद्रभागा पंडित, रमाबाई पंडित, मंदाबाई पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील तरुण वर्गाने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंदराज पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक भदाणे सर यांनी केले. सर्व पाहुण्यांना मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment
0 Comments