वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हाप्रमुख : मनोहरजी गायकवाड
बदलापूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्यात विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण युती झाली आहे.
या युतीचा उद्देश शहरातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांतील प्रश्नांची शाश्वत सोडवणूक करणे हा आहे. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवली आहे.
स्थानिक प्रशासनाचा कारभार पारदर्शक, उत्तरदायी आणि भ्रष्ट्राचारमुक्त राहावा, यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकात्मिक प्रयत्नांतून बदलापूर महाराष्ट्रातील आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष श्री. आशिष दामले, भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष व गटनेते श्री. राजेंद्र घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. प्रभाकर पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष बदलापूर (पूर्व) श्री. रमेश सोळशे, माजी नगरसेवक श्री. शरद तेली, श्री. राम लिये तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments