वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके
नवी दिल्ली : देशाच्या न्यायप्रणालीचा सर्वोच्च स्तर मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाजवळ एका वकिलाने अचानक येत बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ दक्षता घेत त्या वकिलाला अटक केली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे म्हणत ही धक्कादायक कृती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.
घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून, अनेक सामाजिक संघटना आणि न्यायप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकारावरून न्यायव्यवस्थेतील जातीय मानसिकता आणि असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एका अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न होणे, हे सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर असा हल्ला होऊ शकतो, तर सामान्य अनुसूचित जातीच्या नागरिकांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच नको.”
देशात अजूनही काही ठिकाणी ब्राह्मणी मानसिकतेची खोलवर रुजलेली छाया असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली आर्थिक निकषावर चर्चा होत असताना अशा प्रकारच्या घटनांनी समाजात निर्माण झालेल्या विषमतेची पुन्हा आठवण करून दिली आहे.


Post a Comment
0 Comments