Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सक्षम गिते यांचा उल्लेखनीय यश – सहावा क्रमांक पटकावला


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके

कल्याण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका (क्रीडा व सांस्कृतिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा 2025 डोंबिवली येथील गार्डियन स्कूल येथे उत्साहात संपन्न झाली.


या स्पर्धेमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमधील सुमारे पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. 14 वर्षांच्या आतील गटात सक्षम वैभव गिते या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत 5 फेऱ्या जिंकून सहावा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल गार्डियन स्कूलमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सक्षम गिते यांचा मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


पहिल्या सहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवल्यामुळे सक्षम वैभव गिते यांची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशात शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. महेश पुजारी यांचे मार्गदर्शन तसेच सक्षमचे चुलते श्री. राहुल गिते यांचे कॅरम खेळातील प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले.


नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव ऍड. डॉ. केवलजी ऊके आणि रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी मोरे यांनी सक्षम गिते यांचे अभिनंदन करून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. विजय सरकटे व उपजिल्हाधिकारी गुजर यांनीही सक्षम गिते यांच्या यशाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments