वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड
आसनगाव —
दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, वार रविवार रोजी स्नेहा रोकडे मेमोरियल फाउंडेशन आणि जागर मानवतेचा या सोशल मीडियावरील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आसनगाव येथे भव्य आंबेडकरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन थोर समाजसेविका सौ. लताताई भरित यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी श्री. प्रभाकर रोकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेश निकम (संघकारा) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रकाश वानखेडे यांनी केले. या कवी संमेलनात बुद्धीराज गवळी, प्रतीक कांबळे, संजय रोकडे, कांतीलाल भडांगे, राजेंद्र बनसोडे, गणेश अहिरे, विकास भंडारे, वसंत हिरे, प्रतीक नाईक, वसंत वाघमारे आदी आंबेडकरी कविंनी आपल्या सशक्त कवितांद्वारे समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. शेखर भरित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आसनगावात झालेल्या या आंबेडकरी कवी संमेलनाने प्रेक्षकांना विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी कवितांची अविस्मरणीय मेजवानी दिली.



Post a Comment
0 Comments