वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड
सावरोली सो. (ता. शहापूर, जि. ठाणे) — गेल्या तीन दिवसांपासून गावात वीजपुरवठा बंद असल्याने संपूर्ण गाव अंधारात होते. ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी पिण्याच्या पाण्यापासून ते घरगुती कामांपर्यंत मोठा त्रास सहन करावा लागत होता.
डीपी जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो. चे उपसरपंच मा. जयवंत शंकर दवणे (बाबा) यांनी पुढाकार घेतला. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर आज (८ ऑक्टोबर) दुपारी नवी डीपी बसवण्यात आली आणि सायंकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा पुनर्संचयित करण्यात आला. वीजपुरवठा सुरू होताच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुले, महिला आणि तरुण वर्गाने “आता पुन्हा उजेड आला!” असे म्हणत आनंदाने जल्लोष केला.
ग्रामस्थांनी उपसरपंच जयवंत दवणे यांचे विशेष आभार मानले. “अंधारात गेलेले तीन दिवस आता उजेडात रूपांतरित झाले. गावाच्या समस्येकडे तत्परतेने लक्ष देऊन उपाय केलेल्या दवणे सरांचा आम्ही मनापासून गौरव करतो,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments