Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

आरएसएसने भारताचा संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रति स्वीकारण्यास नकार!

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

कार्यकारी संपादक रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आरएसएस कार्यालयासमोर संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रति सुपूर्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आरएसएसने या सर्व प्रती स्वीकारण्यास नकार दिल्याने वातावरणात एकच खळबळ उडाली.


वंचित बहुजन आघाडीचे नेते सांगतात की, संविधानाचा, तिरंग्याचा आणि लोकशाहीचा आदर न करणाऱ्या आरएसएसला या प्रती देऊन त्यांना भारताच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून द्यायची होती. तसेच, बिननोंदणीकृत असलेल्या आरएसएसने महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टअंतर्गत आपले पंजीकरण करावे, असा हेतू या उपक्रमामागे होता.


परंतु आरएसएसच्या प्रतिनिधींनी संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टच्या प्रती स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी या प्रती स्वीकारून परिस्थिती हाताळली.


या प्रसंगी –


सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा दिला,


अमित भुईगल यांनी भारताच्या संविधानाची प्रति दिली,


शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टची प्रति सुपूर्द केली.


या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, “आरएसएस हे भारतीय संविधान, तिरंगा आणि आपले अधिकृत पंजीकरण यांच्याविरोधात उभे राहून भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा अपमान करत आहे.”





Post a Comment

0 Comments