Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक व निष्पक्ष तपासासाठी CBI चौकशीची मागणी




वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून तपास CBI कडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने करण्यात आली.


या संदर्भात राज्य महासचिव ऍड. डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सचिव वैभव गिते व ऍड. अमोल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.


संघटनेतर्फे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक व निष्पक्ष तपासासाठी CBI चौकशीची मागणी

1️⃣ आरोपी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांना तात्काळ अटक करून, त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांनाही सह-आरोपी ठरवावे.

2️⃣ आरोपी पोलीस अधिकारी असल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता असून, तपास CBI कडे वर्ग करण्यात यावा.

3️⃣ घटनास्थळाचा पंचनामा फॉरेन्सिक टीममार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंगसह करण्यात यावा.

4️⃣ डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या मजकुरानुसार आरोपींवर बलात्काराचे गंभीर आरोप असून, संबंधित कलमे तात्काळ वाढवावी. आरोपींवर नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात याव्यात.

5️⃣ आरोपी व मयत डॉक्टर यांच्या मोबाईल व सोशल मीडियातील सर्व पुरावे तात्काळ जप्त करून तांत्रिक तपास करावा.

6️⃣ मयत डॉक्टरांनी यापूर्वी केलेले सर्व अर्ज तपासात समाविष्ट करून, त्यावर कारवाई न करणाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करावी.

7️⃣ फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व सातारा सिव्हिल सर्जन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी.

8️⃣ डॉक्टर मुंडे यांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालांची चौकशी करून आरोपींच्या दबावाखाली अहवालांमध्ये बदल झाले काय याची तपासणी करावी.

9️⃣ सर्व पंच शासकीयच असावेत आणि फलटण तालुक्याबाहेरील अधिकारी निवडावेत.

10️⃣ पोलीस अधिकारी तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

11️⃣ या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने निकाल लावण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश द्यावेत.

12️⃣ विशेष सरकारी वकिलांची तसेच त्यांच्या सहाय्यकांची नियुक्ती करण्यात यावी.

13️⃣ तपासाच्या प्रगतीबाबत नियमित पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती द्यावी.

14️⃣ फलटण तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याने त्यांना भयमुक्त वातावरणात काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.


अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.


या वेळी उपस्थित होते —

वैभव तानाजी गिते (राज्य सचिव, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस),

अमोल बाळासो सोनवणे (विशेष सरकारी वकील, बारामती व सदस्य जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, पुणे),

अनिकेत राजेंद्र मोहिते, गोविंद अरुण मोरे, आप्पा महादेव गायकवाड, जय हनुमंत माने, प्रणव भागवत व मंगेश भागवत.




Post a Comment

0 Comments