वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड
सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलकडी आदिवासी पाड्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक नागरिकांना पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. मात्र, आज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला.
ग्रामसेवक व सरपंच यांनी टाकी पठार प्राथमिक आरोग्य केंद्रातील (PHC) डॉक्टरांना फोन करून तात्काळ दवाखान्याची गाडी बोलावली. त्यानंतर रुग्णांना तत्परतेने दवाखान्यात हलवण्यात आले. रुग्णांसोबत ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते महाबळ राम गांगड हे स्वतः रुग्णांसोबत टाकी पठार आरोग्य केंद्रात पोहोचले.
तेथे डॉक्टर रूपाली ढाणे यांनी रुग्णांची तपासणी करून अशी माहिती दिली की, “दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडले आहेत.” सर्व रुग्णांना आवश्यक औषधोपचार देऊन सलाईन लावण्यात आले असून, त्यांना दवाखान्यात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
डॉक्टरांशी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चर्चा केली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय सर्वांच्या मताने घेण्यात आला आहे.




Post a Comment
0 Comments