Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पूरग्रस्तांसाठी रेणुका माता मंदिर व मनपा कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर — अलीकडील मुसळधार पावसामुळे संभाजीनगर, जालना, पैठण परिसरासह मराठवाड्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून देणारा उपक्रम राबविण्यात आला आहे.


संभाजीनगर येथील रेणुका माता मंदिर विश्वस्त मंडळाने पूरग्रस्तांसाठी तब्बल ₹1 कोटींची देणगी देण्याची घोषणा केली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या पगारातून ₹50 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही देणगी रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीकडे वर्ग करण्यात येणार असून, ती थेट पूरग्रस्तांना मदत म्हणून वापरली जाणार आहे.


महानगरपालिकेचे आयुक्त तसेच मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही मदतीची घोषणा करण्यात आली. पूरग्रस्त भागातील जनतेच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी गट आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.


रेणुका माता मंदिराने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत शहरातील लोकांसाठी मदतीचा हात दिला आहे. तर मनपा कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Post a Comment

0 Comments