वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड
मुंबई (दि. २ ऑक्टोबर) — महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
या संदर्भातील अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जारी केली असून, संबंधित जिल्हाधिकारी याबाबतची प्राथमिक सूचना १० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करणार आहेत.
सदर आरक्षण सोडतीनंतर प्राप्त झालेल्या अभ्यावेदनांचा (हरकती व सूचना) विचार करण्यासाठी २४ ते २९ ऑक्टोबर २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व प्राप्त हरकतींचा विचार करून १ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता अधिक वेगाने पार पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment
0 Comments