धर्मांतराची घोषणा
जगणे झाले होते अडगळीचे
नव्हता सन्मान जिंदगीला
एक भीम गर्जना झाली
धर्मांतराच्या घोषणेला......
धर्म मार्तंडाणी माजविले होते स्तोम
मानवतेला होता काळीमा
स्पृश्य अस्पृश्यतेचा
त्याला दिला होता मुलामा....
जिवंतपणी होत्या नरक यातना
जगण्या झाले होते महाग
एवढे शिक्षण घेतले
तरी जात नव्हता डाग.....
वाट पाहिली बदलाची
पण सुने होतेच शिवार
मग केले घोषणा धर्मांतराची
वंदन बुद्धाला करुण त्रिवार..
जन्म झाला ज्या धर्मात
त्यात दोष माझा नव्हता
किती दुःख सहन करतील बांधव
दारिद्र्यात जीवन जगता....
जिणं होईल सोन्याचं
ठाम मनी विश्वास केला
त्याग करीन धर्माचा
भीमगर्जनेत उच्चार केला....
आता जगणे तुमचे
कसे सफल ते झाले
नका विसरु बा भिमाला
थोर त्यागी महामानवाला....
घोषणा धर्मांतराची....
✍️ बौद्धाचार्य मनोज रामचंद्र गायकवाड.
शहापूर जिल्हा ठाणे 🌹


Post a Comment
0 Comments