Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

केळीच्या ट्रकमध्ये अपघात — बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

कार्यकारी संपादक रितेश साबळे

बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघात । घडला असून, केळीने भरलेला ट्रक पलटल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील टुनकी-सोनाळा रस्त्यावर घडली असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४८ एय-४८१५ क्रमांकाचा आयशर ट्रक केळीची वाहतूक करत होता. ट्रकमध्ये काही मजूरही प्रवास करत होते. ट्रक अतिवेगाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. ट्रक पलटल्याने काही मजूर वाहनाखाली अडकले, त्यामुळे दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. आणखी तिघे मजूर किरकोळ जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून बाजूला केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रकमध्ये अतिरिक्त ओझे होते आणि चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.



Post a Comment

0 Comments