वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी होऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीने पूर्ण तयारीला सुरुवात केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत निवडणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर, स्थानिक प्रश्न, पक्षाचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत कसे पोहोचवावेत तसेच आगामी निवडणुकांमधील संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठीचे नियोजन यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता प्रस्थापित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई, सर्व आघाड्यांचे महासचिव, प्रभाग समन्वयक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments