वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे .
बीड : दिः 19 ऑक्टोंबर रोजी
आष्टी तालुक्यातील अंभोरा–हिवरा मार्गावर रविवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या छातीत गोळी लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मृतदेहाजवळ एक पिस्तूल पडलेले आढळले आहे. त्यामुळे ही घटना हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रात्री उशिरा गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. पहाटे काही शेतकऱ्यांना युवकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसला. यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले.
या घटनेने अंभोरा परिसरात खळबळ उडाली असून, संदिग्ध मृत्यूमागे वैयक्तिक वाद की गुन्हेगारी राग? यावरून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले जात आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, पुढील 24 तासांत मृत व्यक्तीची ओळख पटवून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.


Post a Comment
0 Comments