Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भिवंडीत ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि भव्य धम्म मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहरजी गायकवाड .

भिवंडी – भारतीय बौद्ध महासभा, भिवंडी तालुका यांच्या वतीने मागील तीन वर्षांपासून (२०२३ पासून) धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि हजारो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा २०२५ मध्येही या परंपरेचा पुढाकार घेत भव्य धम्म मेळावा ठाणे–पालघर जिल्ह्यात आदर्शवत पद्धतीने कृणाल फार्म, कवाड, भिवंडी येथे संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थित होते.


आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डॉ. आंबेडकर यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्रांती केली. बाबासाहेबांच्या सर्व संघटनांना न्याय देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. बौद्ध धम्म एका समाजापुरता मर्यादित ठेवू नका. आपला इतिहास दडपला गेला आहे, तो पुन्हा जगासमोर आणणे हे आपले कर्तव्य आहे. महाबोधी विहाराचा प्रश्न हा आपल्या अस्तित्वाशी आणि प्रेरणेशी संबंधित आहे. आगामी जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये 'बौद्ध' असे लिहा. आपण दहा कोटींच्या वर गेलो आहोत हे दाखवून द्यावे, हीच बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची खरी उपलब्धी असेल.”


या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन आद. हरीश रावलिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष आद. जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्षा केसरीताई मौर्या, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद. राजेश पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख आद. सुप्रिया कासारे, ठाणे जिल्हाध्यक्ष आद. विजय गायकवाड, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा आद. शीलाताई तायडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हिरामण पगारे, जिल्हा महिला संरक्षण सचिव सुशिलाताई गायकवाड, कार्यालयीन सचिव प्रशांत गांगुर्डे, जिल्हा संघटक अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहित जाधव तर स्वागताध्यक्षा म्हणून महिला अध्यक्षा रंजना भोईर यांची निवड करण्यात आली होती.



समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बँड पथकासह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. यामध्ये भिवंडी तालुक्यातील माजी तालुकाध्यक्ष दिलीप जाधव गुरुजी, माजी सरचिटणीस प्रमोद गायकवाड गुरुजी, संरक्षण उपाध्यक्ष बापू माने, रणदिवे आदींचा सहभाग होता.


कार्यक्रमादरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या बदलापूर येथील महिला टीमने भगिनी वैभवी अडसुळे, जितेंद्र कांबळे आणि सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली “कथन अंधाराला भेदणारं” हे प्रभावी नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.


प्रमुख पाहुण्यांचा सन्मान “जनता, जाती व्यवस्थेचे निर्मूलन” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकाने करण्यात आला. यामधून समाजात वाचनसंस्कृती वाढविण्याचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ बौद्धाचार्य ॲड. शशिकांत जाधव आणि संदीप जाधव यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सरचिटणीस संदीप जाधव, ॲड. सचिन भोईर, ॲड. शशिकांत जाधव, संजय गायकवाड, अजय गायकवाड, योगेश मोहिते, किशोर गायकवाड, समीर जाधव, धार्मिक गायकवाड, मंगेश गायकवाड, कैलास चव्हाण, दिलीप जाधव, सागर जाधव, संजय जाधव, महेश केदार, प्रमोद गायकवाड, श्वेता भालेराव, बारकुबाई गायकवाड, रेणुका पवार, रजनी गायकवाड, आश्विनी चन्ने, रीना जाधव, प्राची लोकरे, चेतना गायकवाड आणि सविता पवार यांनी विशेष मेहनत घेतली.


ठाणे–पालघर जिल्ह्यातील तसेच भिवंडी, कल्याण आणि वाडा तालुक्यातील अनेक मान्यवर, पत्रकार आणि हजारो धम्मबांधवांच्या उपस्थितीत ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि भव्य धम्म मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.


भारतीय बौद्ध महासभा, भिवंडी तालुका यांच्या वतीने सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि उपस्थितांचे जाहीर आभार मानण्यात आले.



Post a Comment

0 Comments