Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शहापूर तालुक्यात बहुजन समाज पार्टी लढणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड

शहापूर :

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी शहापूर तालुक्यात आपले उमेदवार उभे करणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेला हा पक्ष सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र घेऊन कार्यरत आहे. यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, जनतेच्या प्रश्नांवर आधारित लढाई उभारणार असल्याचे तालुका अध्यक्ष गुरुनाथ लोखंडे साहेब यांनी सांगितले.


शहापूर तालुक्यात एकूण १५ जिल्हा परिषद गट आणि ३० पंचायत समिती गण आहेत. या ठिकाणांपैकी काही ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची इच्छा असलेल्या इच्छुक उमेदवारांनी बहुजन समाज पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष गुरुनाथ लोखंडे (मो. ९६१९८९२९१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बहुजन समाज पार्टीने शहापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिला होता. प्रत्येक निवडणुकीत पक्ष आपली भुमिका ठामपणे मांडत आला असून, कार्यकर्ते तन, मन आणि धनाने पक्षाच्या बळकटीसाठी कार्यरत राहतील, असा आत्मविश्वास तालुका अध्यक्ष लोखंडे यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments