वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
अंबड, दि. 17 ऑक्टोबर 2025 – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची अंबड तालुका आढावा बैठक हॉटेल वृंदावन येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. सतिष मामा खरात यांनी भूषविले.
अंबड तालुका व शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी या बैठकीस उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. बैठकीदरम्यान मा. सतिष मामा खरात यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी संघटन बळकट करण्याचे, पक्षाच्या विचारधारेचा व्यापक प्रसार करण्याचे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीत ज्येष्ठ नेते मा. विष्णूकुमार शेळके यांनी निवडणूक नियोजन, प्रचार पद्धती आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयाबाबत मार्गदर्शन केले. तर मा. सुभाष (आबा) ससाणे यांनी आपल्या दीर्घ राजकीय अनुभवावर आधारित मोलाचे विचार मांडले.
अंबड तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची मते मांडली. यावेळी पक्ष आदेशानुसारच निवडणूक लढविण्याचा, तसेच युती झाली तर संयुक्तपणे आणि युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीस जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष मा. सतिष मामा खरात, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात, जिल्हा उपाध्यक्ष मा. आप्पासाहेब झाकणे, जिल्हा सल्लागार मा. गोवर्धन जाधव, जिल्हा संघटक मा. सुभाष आबा ससाणे, जिल्हा सचिव शेषराव शिनगार, अंबड शहराध्यक्ष मा. अशोक भाऊ साळवे, अंबड तालुका अध्यक्ष मा. किशोर भाऊ तुपे, तालुका महासचिव ॲड. शेळके साहेब, तसेच अंबड शहर उपाध्यक्ष मा. अतिष खरात यांचा समावेश होता.
या बैठकीमुळे अंबड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे.



Post a Comment
0 Comments