वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका (प्रतिनिधी) –शंकरजी गायकवाड
भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी आज शहापूर तालुक्याचा दौरा करून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी खासदार म्हात्रे यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या उपस्थितीत नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे अविनाश थोरात, युवक अध्यक्ष अविनाश साबळे, रंजिता दुपारे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments