Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पैठण गेट ते सिटी चौक ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम राबविण्याची तयारी — व्यापाऱ्यांची सहमती, महापालिकेचा पुढाकार


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

कार्यकारी संपादक : रितेश साबळे .

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहरातील ऐतिहासिक पैठण गेट परिसर ते सिटी चौक आणि शहागंज या मार्गावर ‘स्ट्रीट फॉर पीपल’ हा उपक्रम राबविण्याची तयारी सुरू असून, नगरपालिकेने या योजनेसाठी प्रारंभिक प्रस्ताव तयार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि ऐतिहासिक परिसर पादचारी, सायकलस्वार आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि आकर्षक बनविणे हा आहे.


या योजनेअंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्गांची उभारणी, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था आणि सार्वजनिक सोयीसुविधा वाढविण्याचा मानस आहे. पैठ पैठण गेट ते सिटी चौक ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम राबविण्याची तयारी — व्यापाऱ्यांची सहमती, महापालिकेचा पुढाकारण गेट ते गुलमंडी आणि सिटी चौक दरम्यान हा उपक्रम प्रथम टप्प्यात राबविण्याची योजना असून, स्थानिक व्यापारी व व्यावसायिक यांची सहमतीही मिळविण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या सोयीचा विचार करून प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.


दरम्यान, ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाच्या नियोजनानंतर पैठण गेट व गुलमंडी परिसरात काही ठिकाणी अतिक्रमण आणि पथविक्रेत्यांवरील नियंत्रणासाठी महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने कारवाई केली. या कारवाईमुळे काही ठिकाणी किरकोळ तणाव निर्माण झाला असला तरी, बहुतेक व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या उपक्रमास पाठिंबा दिला आहे.


या उपक्रमामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल, पर्यटन वाढेल आणि बाजारपेठेचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments