वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण
जिंतूर (प्रतिनिधी) –
जिंतूर नगरपरिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवड प्रक्रियेला वेग दिला आहे. पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 09 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असून, या मुलाखतीसाठी सर्व स्तरातून इच्छुकांची नोंदणी करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत उमेदवारांच्या स्थानिक पातळीवरील कामाचा अनुभव, समाजातील संपर्क, संघटनातील सहभाग आणि निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीची माहिती पडताळली जाणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे तसेच तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक महासचिव सतीश वाकळे यांनी सांगितले की, “उमेदवार निवडताना पक्ष सेवा, समाजातील विश्वास आणि जनतेशी असलेला संवाद हे निकष महत्त्वाचे असतील. इच्छुकांनी संबंधित कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे.”
मुलाखतींचे आयोजन माजी सैनिक फंक्शन हॉल, हुतात्मा स्मारक कॉलनी, जिंतूर येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments