वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
सिद्धेश्वर गावात घरकुल योजना लाभार्थ्यांच्या थकित हप्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरकुल योजना पूर्ण करूनही बजेटअभावी अनेक गोरगरीब लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित होते. पंचायत समिती औंढा (ना.) येथील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण आणि जिओ-टॅगिंगची प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात होती, त्यामुळे लाभार्थी मोठ्या अडचणीत होते.
या अन्यायाविरुद्ध गावातील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हाफीज जागीरदार यांनी सातत्याने तक्रारी दाखल करून, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा करत उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यांच्या ठाम आणि संघर्षपूर्ण भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
आज सिद्धेश्वर गावात घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण आणि जिओ-टॅगिंगच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी जागीरदार यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, “जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवले,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गोरगरीबांना त्यांचा योग्य हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार अब्दुल हाफीज जागीरदार यांनी व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments