वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सुरू असलेल्या अंतर्गत तणावाला आज नवे वळण मिळाले आहे. विभागातील उपअभियंता महेश चौधरी यांच्या वर्तनामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करत प्लंबर असोसिएशनने थेट आयुक्तांकडे निलंबनाची मागणी दाखल केली आहे.
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार,
चौधरी हे कंत्राटदार व परवानाधारक प्लंबर यांच्याशी गैरवर्तन करतात,
तांत्रिक कामांवर अनावश्यक दबाव आणतात,
कार्यालयात शिवीगाळ व धाक-धमकीचे वातावरण निर्माण करतात,
ज्यामुळे अनेक कामे ठप्प झाली असून नागरिकांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेलाही त्याचा फटका बसत आहे.
तक्रारदारांनी आरोप केला आहे की, मागील काही महिन्यांत वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने आता त्यांनी थेट निलंबनाची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिका प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या घडामोडीमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली असून, रोजच्या पाणी समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे लक्ष आता प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लागले आहे.


Post a Comment
0 Comments