Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘महार वतन’ जमीन खरेदीप्रकरणी गंभीर आरोप; जमीन जप्त करून मूळ वतनदारांना परत द्यावी — रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.




वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर दिनांक : 7 नोव्हेंबर 2025

पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकर ‘महार वतन’ जमीन संशयास्पद पद्धतीने व अत्यल्प किमतीत खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पक्षाचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या Amadea Holdings LLP या कंपनीने अंदाजे ₹1800 कोटी बाजारमूल्य असलेली जमीन केवळ ₹300 कोटींना खरेदी केली, तसेच ₹21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीला माफी देण्यात आली असून फक्त ₹500 भरून व्यवहार पूर्ण झाला, जे अत्यंत संशयास्पद असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.


घोटाळ्याची ठळक मुद्दे :


1. जमिनीचे बाजारमूल्य आणि खरेदीमूल्य यामध्ये प्रचंड विसंगती.

2. स्टॅम्प ड्युटी अत्यल्प भरण्यात आल्याचा आरोप.

3. व्यवहार अल्पावधीत आणि जलदगतीने पूर्ण.

4. जमीन ‘महार वतन’ प्रकारातील असून खरेदीसंदर्भातील नियमांचे पालन नसल्याचा संशय.


5. सरकारी महसूल नियमांचे उल्लंघन झाल्याने शासनाचे मोठे नुकसान.


पक्षाच्या मुख्य मागण्या :


1. पार्थ पवार व त्यांच्या कंपनीने बेकायदेशीररित्या खरेदी केलेली जमीन तात्काळ जप्त करून ती मूळ वतनदारांना परत द्यावी.

2. या व्यवहारातील सर्व संबंधित — पार्थ पवार, कंपनीचे अधिकारी तसेच मदत करणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी — यांची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.

3. महार वतनाची जमीन खासगी कंपनीला कशा नियमांतर्गत दिली गेली याची विस्तृत चौकशी करावी.

4. स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय कोणी घेतला आणि कोणत्या अधिकारात घेतला, याचा खुलासा करावा.

5. मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी या व्यवहारावर तात्काळ स्पष्टीकरण द्यावे आणि जमीन जप्त करण्याचे आदेश द्यावेत.

6. शासनाचे झालेले महसूल नुकसान आणि व्यवहारातील आर्थिक तफावत याची स्वतंत्र तपासणी करावी.

7. जमीन खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्यांचे पालन झाले की नाही, विशेषत: वतनजमिनींसंबंधीचे नियम पाळले गेले का, याची खात्री करावी.

8. संपूर्ण चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा.


निवेदन देताना मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, मराठवाडा उपनेते जयनाथ बोर्डे, सुधाकर साबळे, प्रकाश घोरपडे, अनिस गंगापूरकर आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments