वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
किन्हवली प्रतिनिधी : बाळकृष्ण सोनावणे,
ग्रुप ग्रामपंचायत सावरोली (सो) येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे रोजगार सेवक श्री. निखिल मोंडूला यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. धूप प्रज्वलित करून परिसर सुगंधित करत दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यानंतर श्री. निखिल मोंडूला यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्य, त्यांचे क्रांतिकारी योगदान आणि आदिवासी समाजाच्या साठी केलेल्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री. मधुकर निरगुडा, ग्रामसेविका श्रीमती राऊत, सदस्य वाघ ताई, सामाजिक कार्यकर्ते श्री. बळीराम गांगड, माजी उपसरपंच श्री. श्रीराम गांगड, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेष म्हणजे वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुकाप्रमुख आणि तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रुप ग्रामपंचायत सावरोली (सो) श्री. शंकर गायकवाड यांनीही बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता श्री. निखिल मोंडूला यांनी केली.




Post a Comment
0 Comments