वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
परभणी जिल्हा प्रतिनिधी — पंकज चव्हाण
कुऱ्हाडी (दिः 15 ) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत सभागृहाचे उद्घाटन राज्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोडीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या भव्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे पेरे पाटील विशेष उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोडीकर यांचा सत्कार कुऱ्हाडीचे सरपंच रामकोर गोविंद राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे पेरे पाटील यांचे स्वागत युवा कार्यकर्ते सुनील इंझे यांनी केले.
या प्रसंगी बामणी पोलीस स्टेशनचे पी.आय. शिंदे, बीट जमादार चव्हाण, पोलीस कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात भाषण करताना पेरे पाटील म्हणाले की,
“ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा पाया आहे. निधी योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. गाव स्वच्छ आणि पाणीटंचाईमुक्त ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ग्रामसेवकाकडून चांगले काम करून घ्यावे. ग्रामसेवकाची बदली अनाठायी करू नये — काम करून घेणे महत्त्वाचे आहे.”
ग्रामविकास, सुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर भर देत त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.



Post a Comment
0 Comments