Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नाशिक | प्रगतिशील लेखक संघाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

मिलिंदराज पंडित 

रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक येथील आयटक कार्यालयात (प्रिया हॉटेलवर, जुने सीबीएस समोर) प्रगतिशील लेखक संघाची महत्त्वपूर्ण बैठक सुप्रसिद्ध कादंबरीकार व संघाचे राज्य सचिव राकेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.


बैठकीत साहित्य, सामाजिक प्रश्न व संघटन बळकटीकरण यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.



या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी विधिवतपणे पदभार स्वीकारला. कार्यक्रमाला नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जयवंत खडताळे, सचिव तुकाराम चौधरी, कार्याध्यक्ष पंढरी पगारे, नाशिक शहर कार्यकारिणी सचिव शिल्केशा अहिरे, कार्याध्यक्ष अशोक भालेराव, इफ्टा प्रतिनिधी तल्हा शेख, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रमोद अहिरे, कॉम्रेड राजू देसले, प्रा. रामदास भोंग यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शाल, पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा मनपूर्वक गौरव करण्यात आला.



Post a Comment

0 Comments