वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर, दि. 24 नोव्हेंबर —
६ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे निवेदन सादर केले.
या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन असून भारतीय संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान, सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य आणि देशासाठी असलेले प्रेरणादायी योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
सामान्य प्रशासन विभागाने ६ डिसेंबर रोजी मुंबई व उपनगरांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील चैत्यभूमी तसेच राज्यभरातील स्मारकांवर लाखो अनुयायी भेट देतात. त्यामुळे राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यास नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना आदरांजली वाहण्याची संधी मिळेल तसेच वाहतूक व प्रशासनावरचा ताणही कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, नेते हनु नाना, पूर्व शहराध्यक्ष बाबर खान आदी संघटक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments