प्रतिनिधी : आनंद भालेराव
रत्नागिरी :
एन आर एम युचे 71 वे वार्षिक अधिवेशन रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे भव्य महारॅली काढण्यात आली. रत्नागिरी स्टेशनपासून सुरू झालेल्या या रॅलीमुळे परिसर कामगारमय घोषणांनी दुमदुमून गेला.
ही महारॅली आदरणीय कॉ. वेणू पी. नायर, महामंत्री – मध्य रेल्वे/कोकण रेल्वे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. “आठवे वेतन आयोग तात्काळ लागू करा!”, “कामगार-विरोधी कायदे रद्द करा!”, “रिक्त पदे त्वरित भरा!”, “रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या!”, “ठेकेदारी प्रथा बंद करा!” अशा घोषणांनी रॅली अधिक जोशपूर्ण झाली.
महारॅलीत मध्य रेल्वे व कोकण रेल्वे मंडळातील हजारो कामगारांनी सहभाग नोंदवला. पुढे ही महारॅली एका भव्य सभेत रूपांतरित झाली.
सभेला मार्गदर्शन करताना कॉ. वेणू पी. नायर यांनी कामगारांना भक्कम संदेश देत म्हटले की,
“येणारा काळ हा कामगार वर्गासाठी संघर्षमय असणार आहे. संघर्ष करण्यासाठी संघटनेची ताकद वाढवणे ही आजची गरज आहे. सर्व धर्मांना समान मानणारी आणि कामगारांच्या प्रत्येक हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे एनआरएमयू आहे.”
सभेला ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन – मुंबई मंडळ चे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी “कॉ. वेणू पी. नायर महामंत्री जिंदाबाद!”, “एनआरएमयू जिंदाबाद!”, “लाल बावटा करे पुकार – सभी दुनियाके मजदूर एक हो!” अशा घोषणांनी वातावरण लाल सलामीने भारावून गेले आणि अधिवेशनाचा पहिला दिवस उत्साहात पूर्ण झाला.




Post a Comment
0 Comments