Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पैठणगेट खून प्रकरण – किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू; आरोपी दुकानमालक फरार.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

कार्यकारी संपादक रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर – शहरातील गजबजलेल्या पैठणगेट परिसरात सोमवारी उशिरा झालेल्या वादातून ३३ वर्षीय इम्रान कुरैशी या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. मोबाइल दुकानाजवळ झालेल्या किरकोळ वादातून सुरुवात झालेला हा प्रसंग काही मिनिटांतच रक्तपातात बदलला.


मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान कुरैशी यांच्यामध्ये पैठणगेट येथील मोबाइल दुकानाचे मालक परवेज शेख याच्याशी काही कारणावरून वाद झाला. वाद चिघळत असताना आरोपी परवेज शेख संतापाच्या भरात दुकानातील धारदार शस्त्र घेऊन बाहेर आला आणि इम्रानवर वार केले. गंभीररित्या जखमी झालेल्या इम्रानला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घटना घडताच परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करून घटनास्थळाचा पंचनामा केला असला तरी आरोपी परवेज शेख हा घटनेनंतर फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकरणामुळे पैठणगेट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्यापारी आणि नागरिकांनी रात्री उशिरा वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.



Post a Comment

0 Comments