वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
हिंगोली : भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मा. मंत्री तथा राज्यसभा खासदार मा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिंगोली जिल्ह्यातील अनेक तरुणांनी संघटनेत प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष मा. प्रमोद कुलदीपके यांच्या नेतृत्वाखाली ही आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत हिंगोली तालुक्यात आयु. सुमेध सिद्धार्थ कुऱ्हे यांची तालुका अध्यक्षपदी तर सुरज मदन ठोंबरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच औंढा नागनाथ तालुक्यात रोहित सुभाष इंगोले यांची तालुका अध्यक्षपदी आणि अरविंद विलास ढगे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या नव्या पदाधिकाऱ्यांनी असंख्य समर्थकांसह भीमशक्ती संघटनेत प्रवेश केला.
प्रवेश व आढावा बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी कुलदीपके, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आयु. दिनेशजी हनुमंते, डॉ. चंद्रमुनी पाईकराव, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथजी गायकवाड, पार्डी बु. चे सरपंच प्रकाश मगरे, सिद्धार्थ कुऱ्हे, बालासाहेब कदम, धम्मदीप कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भीमशक्ती संघटनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.



Post a Comment
0 Comments