वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
भटसावंगी (प्रतिनिधी) : जी.प. प्राथमिक शाळा भटसावंगी येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्यावतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवि श्रीरंग इंगोले होते. तसेच आज धरती आबा बिरसा मुंडा जयंती असल्याने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक लोंढे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि माजी विद्यार्थ्यांनीही पूजन करून आदरांजली वाहिली.
माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले तसेच शाळेला आर्थिक सहाय्यही प्रदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंगोळे सरांनी केले. अध्यक्षीय भाषण रवि इंगोले, तालुका अध्यक्ष हिंगोली (NDMJ) यांनी केले. आभार प्रदर्शन चव्हाण सरांनी केले.
कार्यक्रमाला सरपंच रामप्रसाद जाटळे, उपसरपंच ज्ञानेश्वर सवले, विशाल मस्के, ज्ञानेश्वर हराळ, गजानन कपाटे, शंकर गडदे, साईनाथ फलटणकर, रोहिदास मस्के, शिवाजी माहोरे, राहुल भालेराव, नितीन धायगोडे, सोनू मस्के, आकाश मस्के, प्रवीण फलटणकर, नामदेव ससाणे, रघुनाथ कपाटे यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments